13 वर्षांनंतर शिल्पा शेट्टी ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक.

फिटनेस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा शेट्टी 13 वर्षानंतर पुन्हा एकदा चित्रपटात पदार्पण करत आहे. आणि विशेष म्हणजे ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 5 जून 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणून घेऊया चित्रपटाबद्दल!

शिल्पा शेट्टी 13 वर्षानंतर ‘निकम्मा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. आणि तशी पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. पोस्ट मध्ये तिने असे लिहिले आहे की, निकम्मा या चित्रपटातून आपली सेकंड इनींग सुरू करत आहे आणि मी आता 13 वर्षाच्या विश्रांतीला ब्रेक देणार आहे. माझ्या सेकंड इनिंगमधल्या या पहिल्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे. माझ्या आगामी ‘ निकम्मा ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. माझ्यासोबत या चित्रपटाच अभिमन्यू दसानी आणि शिर्ले सेतियाही दिसणार आहेत ,’ असं शिल्पानं म्हटलंय.

शिल्पा शेट्टीने 2007 मध्ये सनि देओलसोबत ‘अपने’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली होती. पण असे असले तरी ती छोट्या पडद्यावर काही कार्यक्रमांमध्ये परीक्षकांची भूमिका करताना दिसली त्याचबरोबर शिल्पा शेट्टीचा स्वतःचं योगा अँप देखील आहे. शिवाय युट्युबवर तिचा फूड शो येतो. चित्रपटापासून लांब असली तरी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून शिल्पा शेट्टी नेहमी अॅक्टीव असते.



* This article was originally published here

Comments